कन्हान ०४ व साटक ०२ असे ०६ कोरोना संक्रमित रूग्ण

तिस-या लाटेची चाहुल ७० कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ८५ रूग्ण.

कन्हान ता.प्र.दी.१५: – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या २६ तपासणी कन्हान ०४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ६७ तपासणीत ०२ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण ०६ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आता पर्यंत ८५ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ७० रूग्णाना होम क्वोरंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना तिस-या लाटे ची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शुक्रवार (दि.१४) जानेवारी च्या आलेल्या तपासणी अहवा लात ०४ रूग्ण संक्रमित आढळले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ६७ तपासणीत आमडी १, डुमरी कला १ असे ०२ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ०६ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ८५ रूग्ण संख्या झाली आहे.
(दि.१) डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कलकत्ता वरून आलेल्या तरूणाची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिस-या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. शुक्वार (दि.१४) जानेवारी २०२२ पर्यंत ७९ कोरोना रूग्ण संक्रमित होते. शनिवार (दि.१५) जानेवारी ला कन्हान केंद्रातुन ०४ रुग्ण. व साटक ०२ असे ०६ कोरोना संक्रमित. आता पर्यंत खाजगी तपास णीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणीत ७४, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे ८ , कामठी – १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण ८५ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ७० रूग्ण होम कोरंटाईन करून उपचार करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *