निमखेडा (तेलनखेडी) येथे विकास कामाचे भुमिपुजन

कन्हान ता.प्र.दी.१५: – पं स पारशिवनी, गोंडेगाव जि प क्षेत्र अंत र्गत ग्राम पंचायत निमखेडा (तेलनखेडी) येथे जल जिवन योजने अंतर्गत १२ लाख व स्वच्छ भारत अभियान ३ लाख निधी विकास कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
पंचायत समिती पारशिवनी, जिल्हा परिषद गोंडेगाव सर्कल अंतर्गत ग्राम पंचायत निमखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत मौजा निमखेडा येथे टाकी दुरुस्ती, स्विच रूम बांधकाम १२ लाख रुपये व स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत सार्वजनिक शौचालय तीन लाख रुपये असे एकुण १५ लाख रुपयाच्या बांध कामाचे भुमिपुजन सभापती श्रीमती मीनाताई कावळे यांचे शुभहस्ते व विरोधी पक्ष उपगट नेता, गोंडेगाव जि प सदस्य व्यकटेश कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी बनपुरी पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, निमखेड़ा सरपंचा सौ.कलावती शुभाष तडस, उपसरपंच श्री देवाजी डोंगरे, ग्रा.प. सद स्य श्री भाऊराव हिंगे, सौ.वंदना कुंभलकर, सौ.काचन वाड़ीभस्मे, सचिव श्री राजकुमार बागड़े, रामभाऊ मल्लेवार, रामदास अवजे, कोषाध्यक्ष भा.ज.पा. अनुसू चित जाती मोर्चा नागपुर जिल्हा श्री धर्मेन्द्र गणविर सह गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *