गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययन स्तर निश्चित करा

गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांची वाचन प्रकल्पांतर्गत शाळांना भेटी, सुचना व मार्गदर्शन.

कन्हान ता.प्र. दी.१३: – गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येका पर्यंत गुणव त्तापुर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून मग वाटचाल केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा योग्य उपयोग होईल, असे आवाहन वाचन प्रकल्प निरीक्षक व रामटेक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांनी केले.
धर्मराज प्राथमिक शाळेत ((दि.१२) दिलेल्या भेटीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी सौ रामटेके मॅडम उपस्थित होत्या. प्रथम गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी तर शिक्षण विस्तार अधिकारी सौ रामटेके मॅडम यांचे स्वागत सौ चित्रलेखा धानफोले यांनी केले. धर्मराज प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम म्हणाल्या की, प्रत्येक शिक्षकांमध्ये प्रथम ‘स्व’ भावना निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक मुल शिकु शकते हा आत्मविश्वास घेऊन शिक्ष कांनी अध्यापन कार्याला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांने अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी व योग्य मार्ग दर्शनासाठी प्रथम अध्ययनस्तर निश्चित करूनच मार्ग दर्शन करायला हवे. तरच ते प्रभावी औषधा सारखे काम करेल. यावेळी त्यांनी पारशिवनी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी श्री कैलास लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे कौतुक करून शिक्षकांनी शाळा बंद काळात सुद्धा याचा पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन हर्षकला चौधरी यांनी तर आभार प्रिती सुरजबंसी यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांच्यासह शिक्षक सौ चित्रलेखा धानफोले, श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री किशोर जिभ काटे, श्री राजु भस्मे, श्री अमित मेंघरे, कु. पुजा धांडे, कु. अर्पणा बावनकुळे, कु. शारदा समरीत, कु. प्रीती सुरजबंसी व कु. हर्षकला चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *