राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद जन्मोत्सव कन्हान ला थाटात साजरा

कन्हान ता.प्र.दी.१३: – येथे विविध संस्था, सामाजिक संघटना द्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून कोविड-१९ प्रतिबंधक निय माचे पालन करित जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती नगरपरिषद कार्यालय प्रांगणात न प नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते राज माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व विनम्र अभिवादन करून कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व नगरसेवक, नगसेविकांनी, अधिकारी व कर्मचा-या नी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक योगेन्द्र रंगारी, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, मनिष भिवगडे, नगर सेविका संगीता खोब्रागडे, कल्पना नितनवरे, अनिता पाटील, रेखा टोहने, नप कर्मचारी लकेश माहतो, भीमराव मेश्राम, रवींद्र पाहुणे, शुभम काळबांडे, शुभम येलमुले, देवीलाल ठाकुर, होमेंद्र बावनथडे सह नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिजाऊ ब्रिगेड कन्हान व सार्वजनिक वाचनालय कन्हान

जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जन्मोत्सवा निमित्य कार्यक्रमाचे सार्वज निक वाचनालय हनुमान नगर येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षेत, प्रमुख अतिथी वासुदेव चिकटे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून ” तु म्हच आम्हच नात काय ? जय जिजाऊ जय शिवराय ” च्या जयघोषाने परिसर शिवमय करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्व प्रथम दिवंगत अनाथा च्या माई सिंधुताई सपकाळ ह्याना दोन मिनिटे मौनधा रण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली . तदंतर जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले हयानी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या मौलिक कार्य आणि सयुक्त जन्मोत्स वाचे महत्व प्रास्ताविकातुन स्पष्ट केले. यावेळी मान्यव रांनी या दोन्ही महान व्यकती जिवनचरित्राचे चिंतन करून समाजोपयोगी कार्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयानी कोविड -१९ शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करून स्वत: ची, कुंटुबाची व समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित महिला, पुरूष नागरिकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करून जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवमती सुषमा बांते हयानी तर आभार शिवमती विद्या रहाटे यानी व्यकत केले.
याप्रसंगी मनोहर कोल्हे, दिनकरराव मस्के, पवन पटले , रंजीत पाजुर्णे, शैलेंद्र दिवे, जिजाऊ ब्रिगेड च्या लता ताई जळते, रंजनाताई इंगोले, कमलताई गोतमारे, अल्का कोल्हे, सुनंदाताई दिवटे, मायाताई निंबाळकर, मनिषा धुडस, पुष्पा चिखले, शितल बांते,अनिता पाजुर्णे, सिंधु गिरडकर, कृष्णाली कोल्हे सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान

पं. जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक आसटकर सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवे कानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी खंडाईत सर, लाखपाले सर, रणदिवे सर, पांडे सर, बम्हनोटे सर, राजेंद्र मोरे, संजय वाघधरे , कोल्हे मॅडम, माहुरकर मॅडम, गजबे मॅडम, क्षिरसागर मॅडम, चित्रा वाघधरे, चित्रा गजभिये सह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *