राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेका नंद यांची संयुक्त जन्मोत्सव थाटात साजरा

कन्हान शहर विकास मंच व्दारे सयुक्त जन्मोत्सव व राष्ट्रीय युवा दिवस थाटात संपन्न.

कन्हान ता.प्र दी.१२: – शहर विकास मंच द्वारे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन प्राथ. आरोग्य केंद्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात मान्यवरांचा हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व विन्रम अभिवादन करून परमात्मा एक दांडपट्टा अखा डा निमखेडा च्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना बुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा करण्यात आला.
बुधवार (दि.१२) जानेवारी २०२२ ला राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेका नंद व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जन्मो त्सव व राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाचे प्राथमिक आरो ग्य केंद्र कन्हान समोरील ग्रीनजीम परिसरात आयोजन करण्यात आले. ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षे त, प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव, मरा ठा सेवा संघ कन्हान समन्वयक व डॉ पंजाबराव देश मुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सर, मंच मार्गदर्शक भरत सावळे, परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा मार्गदर्शक वस्ताद मोहन वकलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवे कानंद व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित विन्रम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी शांताराम जळते, भरत सावळे व अध्यक्ष मोतीराम रहाटे यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्य वरांच्या हस्ते परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखे डा ची सावी वकलकर (सुर्वण), साक्षी सुर्यवंशी (सुर्वण ), अविनाश वकलकर (सुर्वण), उर्वशी मल्लेवार(सिल्व र), अल्केश वकलकर (सिल्वर), छकुली बावणे (कॉ न्स), बुलबुल वकलकर (कॉन्स), शितल वकलकर (कॉन्स), राहुल वकलकर (क्रॉन्स), आदित्य बावने (क्रॉन्स) या विद्यार्थी व विद्यार्थींनींना त्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना बुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून जन्मोत्सव व राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान सचिव सुनिल सरोदे, जेष्ठ नागरिक प्रभा कर रुंघे, गौरव भोयर, केतन भिवगडे, अरविंद नाईक, प्रविण हुड सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांनी तर आभार मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले. यशस्वीतेकरीता कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरी ओम प्रकाश नारायण, सहसचिव सुरज वरखडे, कोषा ध्यक्ष महेश शेंडे, सदस्य हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे सह मंच पदाधिका-यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *