वाघोली शिवारात दोन ट्रकचा भिषण अपघात, एक ट्रक पलटला

ट्रक चालक जख्मी, ट्रक व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

कन्हान ता.प्र.दी.११ : – पोलीस स्टेशन अंतर्गत सात कि मी अंतरा वर नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली बस स्टाप जवळ दोन ट्रकचा भिषण अपघात होऊन ट्रक चालक जख्मी होऊन उपचार सुरू असुन ट्रक व त्यातील मालाचे नुकसान झाल्याने कन्हान पो स्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस सुत्राकडुन प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि.१०) डिसेंबर २०२१ ला रात्री १२ ते २:३० वाजता दरम्यान अरविंद राजबहादुरसिंग शेखरवार आपल्या ताब्यातील ट्रक क्र. आर जे ११ जीबी ४३२१ ने जबल पुर वरून नागपुर कडे धानाचे बोरे घेऊन येत असतां ना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली बस स्टाप जवळ नागपुर वरून जबलपुर कडे चना दाल चा माल घेऊन जाणारा ट्रक क्र. एम पी ५१ बीबी ०४०१ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन रस्ता दु भाजक ओलाडुन समोर जबलपुर कडुन येणा-या ट्रक क्र आरजे ११ जीबी ४३२१ ला जोरदार धडक मारल्या ने ट्रक क्र आरजे ११ जीबी ४३२१ हा ट्रक पलटी होऊ न झालेल्या अपघातात ट्रकचे व ट्रक मधील धान माला चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ट्रक चालक गंभीर जख्मी झाल्याची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन जख्मी चालकाला उप चाराकरिता नागपुर रुग्णालयात पाठवुन घटस्थळाचा पंचनामा करून कन्हान पोलीसांनी फिर्यादी अरविंद राजबहादुरसिंग शेखरवार यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालका विरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७, १८४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *