श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी येथे संविधान दिवस साजरा

कामठी ता.प्र.दी.२७:- राष्ट्रीय सेवा योजना श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी येथे 26 नोव्हेंबर
2021 रोज़ी संविधान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालून कार्यक्रम ची सुरवात करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिद उमेकर तसेच रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. राधेश्याम लोहिया सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी श्रद्धा सुमन अर्पित करून सामुहिक रित्या संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधेश्याम लोहिया यांनी करून भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा मधुरा दीक्षित यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *