महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट क्र. 1,चंदननगर, कामगार कल्याण केंद्र कामठी येथे “कौमी एकता सप्ताह” अंतर्गत ‘महिला मेळावा’

कामठी दी. २४ ता.प्र.:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट क्र. 1,चंदननगर, नागपूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कामठी येथे दिनांक 24/11/2021रोजी “कौमी एकता सप्ताह” अंतर्गत ‘महिला मेळावा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सौ. चंपा वाधवानी नगरसेविका न.प कामठी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. जमील अंसारी गुणवंत कामगार, विशेष उपस्थिती मा.सौ. कांचन वाणी, कामगार कल्याण अधिकारी गट क्र.1 नागपूर यांची लाभली.मा.श्रीमती. उज्वला सुखदेवे सहा.प्रा.समाजकार्य महाविद्यालय कामठी,मा. सौ. भाग्यश्री कदम समाजसेविका तथा मा. सौ. ममता शर्मा अध्यक्ष महिला बचत गट कामठी यांनी “महिलांच्या विकासाचे व कल्याण विषयावर” सुंदर विश्लेषनात्मक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकेत कांचन वाणी यांनी यांनी मंडळाच्या योजना व उपक्रमांची माहिती तसेच श्रम कल्याण युग मासिक ऑनलाईन व मंडळ व युनिसेफ संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कोर्सेस संबंधी माहिती दिली तथा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत केंद्र प्रमुख कामठी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रितेश गुजर, शुभदा गळघटे, सुनीता डाखरे, नलिनी मेहेर व सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *