कामठी फार्मसी महाविद्यालयात वृक्षारोपण

कामठी ता.प्र.दी.१८:- कामठी राष्ट्रीय सेवा योजना श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी, कामठी अंतर्गत महाविद्यालय व वसतीगृह परिसरात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, डॉ दिनेश बियाणी, डॉ अतुल हेमके, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी डॉ मिलिंद उमेकर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करून वृक्षारोपणा व्यतिरिक्त त्यांचे संगोपन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
जांभूळ, गुलमोहर, पिंपळ, निंब, सीसम, बदाम, आवळा, करम, बेल, वड, अर्जुन इत्यादी एकुण ५० पर्यावरण उपयोगी वृक्षांचे यावेळी रोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर.टी. लोहिया, रा.से.यो. चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या या यशस्वी आयोजना करीता संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर तसेच संस्थेचे सचिव श्री सुरेशभाऊ भोयर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *