कामठी फार्मसी महाविद्यालयाचा हार्टफुलनेस संस्थेसोबत सामंजस्य करार

कामठी ता.प्र.दि.१२:- आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्त श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी ने हार्टफुलनेस संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. या करारामुळे श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज हे विदर्भातील प्रथम हार्टफुल कॅम्पस बनलेले आहे. जवळपास १२२ देशामध्ये हार्टफुलनेस संस्थेच्या शाखा आहे. ही संस्था लोकांना ध्यानसाधना व चिंतन विषयी प्रशिक्षण देते. ज्यामुळे लोकं चिंतामुक्त जिवन आणि निरोगी जिवन जगु शकेल. भारतातील सुरवातीच्या ५० काॅलेजांपैकी एकमेव काॅलेज आहे ज्यानी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि उत्कृष्ट शिक्षण मिळावे याकरीता नविन सराव पध्दती अनुसरल्या आहेत. महाविद्यालय हार्टफुल कॅम्पस झाल्यामूळे विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्यांची जोपासना व त्यांचे पालनपोषण केले जाईल.
२१ जुन रोजी झालेल्या या सामंजस्य कराराचा उद्देष म्हणजे विद्यार्थ्यांना आणि कार्यरत कर्मचा-यांना निराषामुक्त करणे, निरोगीमार्गाने जिवनातील आव्हाने व्यवस्थापीत करणे, अनंत उद्देष आणि पुर्ति मिळवने यामुळे विद्यार्थींची शैक्षणिक कार्यक्षमता वाढेल आणि एकसुसंवादी वातावरण निर्माण होईल. या सामंजस करारात प्रशिक्षक आणि हार्टफुलनेस संस्थेचे तज्ञ हे विद्यार्थांसाठी तसेच प्राध्यापकासाठी अनेक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेतील आणी हे सर्व अभ्यासक्रम विद्यार्थांसाठी आणि प्राध्यापकासाठी विनामूल्य असतील. या सामाजस्य करारावर श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. मिलिंद उमेकर आणि हार्टफुलनेस संस्थेचे झोनल हेड संजीब शर्मा यांनी स्वाक्षरी केली.हार्टफुलनेसचे सर्व उपक्रम येत्या आगामी सत्रात सुरू होणार असल्याची माहीती प्राचार्य डाॅ. मिलिंद उमेकर यांनी यावेळी दिली. गेल्या दोन वर्षापासून महाविद्यालय हार्टफुलनेस संस्थेबरोबर विविध कार्यक्रम घेत असल्याचे त्यांनी सांगीतले. या सामंजस्य करारातून विद्यार्थी अधिक चांगले नागरीक म्हणून विकसीत होतील आणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ते उपयुक्त ठरेल अशी ग्वाही डाॅ. मिलिंद उमेकर यांनी दिली.
डाॅ. रष्मी त्रीवेदी आणि डाॅ. रेणुका दास यांना महाविद्यालयामध्ये हार्टफुल कॅम्पस समन्वयक घोषीत करण्यात आले. डाॅ. मिलिंद उमेकर आणि डाॅ. रष्मी त्रीवेदी यांनी डाॅ. ओ. पी. कटारे प्रोफेसर युआयपीएस पंजाब विद्यापीठ हे हार्टफुलनेस सोबत केलेल्या सामाज्यंस करारासाठी एक महत्वाची व्यक्ती आणि प्रेरक असल्याचे सांगीतले. या समारंभात सुधा पेरी, डाॅ. श्रीकांत अण्णावरापू, मनोज जेटवा, अशोक कामडी आणि हार्टफुलनेस संस्थेचे धनंजय कोडोवार उपस्थीत होते. डाॅ श्रीकांत अण्णावरापू यांनी यावेळी हार्टफुलनेस संबंधी अनेक पुस्तके दान केली आणि सुधा पेरी यांनी सर्वांसाठी ध्यान व चिंतामुक्त सत्र आयोजीत केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्राध्यापीका मधूरा दिक्षीत यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार डाॅ. रेणुका दास यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम कोविड १९ च्या मार्गदर्शक सुचनानुसार पार पडला. यावेळी श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे सचिव सुरेशभाऊ भोयर यांनी प्राचार्य व कर्मचा-यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *