रक्तदान एक चळवळ समजून राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा -तहसीलदार अरविंद हिंगे

कामठी ता.प्र.दी.१०:-कामठी येथील रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ठाणेदार ,नायब तहसीलदार मंडळ अधिकारी , माजी उपसभापती ,सरपंच लोकमत सखी मंच सदस्य व तरुणांनी केले रक्तदान
कामठी, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदान एक चळवळ समजून राबविण्यासाठी तरुनाणी पुढाकार घेण्याचे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी लोकमत वृत्तपत्र समूह व सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोरवाल महाविद्यालय सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार अरविंद हिंगे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व,सरस्वती,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बागडे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी अंशुजा गराटे ,नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे, जुनी कामठीचे ठाणेदार राहुल सीरे ,कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, लोकमत सखी मंच संयोजिका नेहा जोशी ,येरखेडा चे सरपंच मंगला कारेमोरे ,रणाऱ्या चे सरपंच सुवर्णा साबरे ,खैरी चे सरपंच मोरेश्वर कापसे, घोरपड चे सरपंच ताराबाई कडू , नगर सेविका संध्या रायबोले ,उपप्राचार्य डॉ रेणुका तिवारी, डॉ विनय चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील नागरिकांना रक्तदान रक्तदानाचे महत्त्व समजून सांगून रक्तदानात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले व लोकमत उपक्रमाची प्रशंसा केली रक्तदान शिबिरात जुनी कामठी चे ठाणेदार राहुल शिंरे, नायब तहसीलदार राजेंद्र माळी ,पटवारी महासंघाचे अध्यक्ष संजय अनवाने, सचिव महेश कुलदीपवार , माजी उपसभापती देवेंद्र गवते ,खैरी चे सरपंच मोरेश्वर कापसे,सह 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले मेयो हॉस्पिटलचे डॉ सागर गवई ,डॉ आशिष वायकर ,डॉ गौरी सांगळे, वंदना भगत ,अनिल बोरकर ,प्राची ,सेजल ,नेहा यांनी रक्तसंकलन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रतिनिधी प्रा सुदाम राखडे यांनी केले व संचालन प्रा असरार यांनी केले आभारप्रदर्शन डॉ रेणुका तिवारी यांनी केले रक्तदान शिबिराला जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल नेते नीधान ,माजी उपसभापती बाळू गवते, उज्वल रायबोले यांनी भेट दिली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा योजना अधिकारी डॉ विनोद शेंडे, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डॉ मोहम्मद असरार, प्रा डॉ किशोर ढोले घनश्याम चाकोले,उमेश मस्के, कामरान जाफरी , रकीब भाई ,राहुल शेळके, लीलाधर दवंडे, पंकज नारदेवार ,मुकेश चकोले ,सुधिर अपाले, प्रा मनोज होले , प्रा मनीष मुडे,प्रा पराग सपाटे, मयुर गुरव, प्रफुल गुरव ,बाबी महेंद्र, गजेंद्र वाट, नंदलाल यादव, सुषमा राखडे, प्रणय राखडे,चंदा माकडे, वंदना भस्मे, सरिता भोयर , राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक राष्ट्रीय छात्र सेनेचे सैनिक यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *