अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.– मंत्री सुनील केदार

सालई व नांदागोमुख येथे बांधावर जाऊन केली पाहणी

सावनेर ता.प्र.दी.५:- आधीच कोरोना सारख्या महामारीमुळे समस्त देश त्राही त्राही झाला आहे. कुठेतरी या देशाला शेती उद्योगाने या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली असता अवकाळी पावसाने मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.
सावनेर तालुक्यातील सालई व नांदागोमुख या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे. वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा झाडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आसता सावनेर- कळमेश्वर मतदारसंघाचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सालई व नांदागोमुख येथील नुकसानीचा आढावा घेण्याकरिता स्वतः शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन भेट घेतली.
यावेळी प्रमुख रूपाने नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, त्याचप्रमाणे महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री सुनील केदार यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.
यावेळी मंत्री सुनील केदार यांनी शेती सोबतच वादळामुळे नुकसान झालेल्या घरांना सुद्धा भेट दिली. व प्रशासनाला तात्काळ नुकसान भरपाई देण्या संबंधि निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *