डॉ प्राज्ञा मेश्राम यांच्या आयुवेर्दीक काढा पावडर ची राज्याच्या स्वावस्थ विभागाने दक्षता विभागा मार्फत चोकशी करावी – किशोर गेडाम

कामठी ता.३० अप्रेल:- सर्दी, खाँसी चे घरगुती औषध कोरोना महामारी वर रामबाण असल्याचे सांगून आयुर्वेदिक चिकित्सक पण बहती गंगा मे हात धुतांनी दिसत आहेत. लोकाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करून डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांनी तयार केलेला पावडर याची राज्याच्या स्वास्थ विभागने दक्षता विभागा मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले आयुर्वेदिक चिकित्सक सर्दी ,खाँसी च्या घरगुती उपचारला कोरोना महामारी वर रामबाण सांगून कोरोना रुग्णांच्या भावनेशी खिलवाड करीत आहेत. डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांनी बनविलेल्या पावडर मध्ये कोण कोणत्या वस्तूचे मिश्रण केले याचे स्पष्टीकरण त्या देत नाही. जेव्हा की प्रत्येक औषधी च्या मागे त्या औषधांमध्ये कोण कोणत्या वस्तू हे मिश्रण आहे व त्यामुळे कोणते लाभ होणार आहेत यासंबंधी तंतोतंत माहिती दिली असते. डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांचे पती युवराज मेश्राम हे ज्या पावडर ची किंमत पन्नास 50 रुपये सुद्धा नाही वर्षा पावडर ची पुडी 150 रुपयांमध्ये कोरोना चे औषध सांगून विकत आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळविण्यासाठी डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांनी तयार केलेला पावडरची पुडी विकण्याच्या रांगेत आहेत .त्यात भाजपाचे समर्थक सगळ्यात पुढे दिसत आहेत. लोकाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब हे पुढे म्हणाले डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांचे पती युवराज मेश्राम पावडर च्या पुढी सोबत एक छोटीशी चिट्ठी देतात ,त्यात लिहिले आहे की कुण कुणं पाणी ,एक चम्मच अद्रक चा रस, एक चमचा लिंबू चा रस ,अर्धा चमचा हळद ,एक चम्मच शहद घ्यायचं हा सर्दी खाँसी चा सगळा घरगुती उपचार आहे. या उपचाराने सर्दी खासी व अन्य वायरस नाहीसा होतात. परंतु डॉक्टर प्रज्ञा मेश्राम सारखे चिकित्सक या प्राचीन आपल्या घरगुती उपचारला आपला अविष्कार मानतात. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा नागपूर येथील कांजी हाऊस चौक रमाई बुद्ध विहार येथील भंते प्रज्ञाशील हे डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांच्याकडे स्वतःचा उपचार करत होते त्यांना कोरोना महामारी ने जीव गमवावा लागला .बहुतेक आता पण डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांच्या पावडर च्या पुड्या त्यांच्याकडे मिळतील. अशाप्रकारे कोरोना महामारी वर टाळूवरचे लोणी खाणारे डॉक्टर उदयास आले असतील तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्वास्थ मंत्री राजेश टोपे यांनी दक्षता विभागामार्फत चौकशी करून काय ते महाराष्ट्राच्या जनते पुढे आणावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *