डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा 21 वितरण केंद्रातुन उपलब्ध

ड्रैगन पैलेस टेम्पल येथील गर्दी टाळण्याकरिता योग्य पाऊल

कामठी ता.प्र.दी.२५:- नागपुर जिल्हयातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. आता बाधितांचा आकडा नवीन नवीन उच्चांक गाठत आहे. अशा भयावह स्थितित कोरोना बाधीतांना व इतरांनाही दिलासा देणे आवश्यक आहे. तेच लोकहित विचारात घेता नागपुर जिल्हयात 21 वितरण केंद्रा मार्फत आज दिनांक 25/04/2021 पासुन 21 वितरण केंद्रा मार्फत काढा वाटप सुरू करण्यात आला आहे. अशी माहीती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.
उत्तर नागपुरातील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी स्वत: हा तयार केलेला आयुर्वेदिक काढा कोरोनावर उपयुक्त ठरला आहे. वर्तमान परिस्थितित खाजगी व शासकीय रूग्णालयामध्ये बेडस् उपलब्ध नाहीत, इंजेक्शन सुध्दा उपलब्ध नाहीत, ऑक्सीजन करिता लोक वनवन फीरत आहेत. अशा बिकट परिस्थितित हा आयुर्वेदिक काढा गरीब लोकांनकरिता उपयुक्त ठरत असुन हा काढा लोकांना सहज उपलब्ध व्हावा व ड्रैगन पैलेस टेम्पल व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयातील गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोणातुन नागपुर शहरात दहा झोन तसेच नागपुर ग्रामीण भागात अकरा वितरण केंद्र सेवाभावी सामाजिक व धार्मिक संस्थेमार्फत 25 तारखेपासुन उपलब्ध करून देण्यात आले.
नागपूर शहरात 10 झोन मार्फत व ग्रामीण भागात मौदा, रामटेक, सावनेर, कुही, उमरेड, नागपुर ग्रामीण कोराडी, महादुला, पारशिवनी, कळमेश्वर व इतर ग्रामीण भागात सामाजिक व धार्मिक संस्थे मार्फत आज पासुन काढा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यात आली व लोकांना सुध्दा आपआपल्या भागात आयुर्वेदिक काढा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
शासनाकडुन लावण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचार बंदी मुळे धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणून या पुढे या सर्व वितरण केंद्राला आयुर्वेदिक काढा हा ड्रैगन पैलेस टेम्पल एैवजी थेट डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या नागपूर येथील आयुर्वेदिक चिकित्सालय मधुन उपलब्ध करण्यात येईल. करिता शासनाने लावलेल्या निर्बंधाचे पालन करीत सामाजिक अंतर ठेवून लोकांनी या वितरण केंद्रातुन आयुर्वेदिक काढयाचा लाभ घ्यावा. असे आव्हान मा. अँड. सुलेखाताई कुंभारे व डॉ. युवराज मेश्राम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *