कामठी येथील विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल येथील काढा वितरण केंद्र पोलीसांनी बळजबरीने बंद केले.

कामठी ता.प्र.दी.१९:- २४ तासात काढा वाटप करण्याकरिता परवानगी न दिल्यास बेमुदत उपोसनाला बसनार – अँड. सुलेखाताई कुंभारे यांचा इशारा.

उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या काढयामुळे अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत असतांना महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय बंद करण्याचे आदेश दिले होते. माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकाराने हे आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी डॉ. प्रज्ञा मेश्राम याच्यावर झालेला अन्याय दुर करण्याकरिता पुढाकार घेवून गुरवार दि. १५/०४/२०२१ ला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सिविल लाइन येथील कार्यालयात भेट घेतली व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढयाने अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाले असल्यामुळे हे आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्या प्रमाणे महापौर यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या विनंतीला त्वरित मान्य करून आयुर्वेदिक चिकित्सालय सुरू करण्याची परवानगी दिली.
शुक्रवार दि. १६/०४/२०२१ ला माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे उत्तर नागपुर येथील आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्यात आले.
उल्लेखनीय आहे की, कोरोनाबाधीत रूग्ण किंवा वेंटीलेटर व ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या गंभीर रूग्णांचा उपचार हा उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये पूर्वी प्रमाणेच सुरू राहील. या गंभीर रूग्णांना योग्य उपचार मिळावा व रूग्णांची गैर सोय दुर व्हावी या करिता फक्त आयुर्वेदिक काढा वितरित करण्याचे केंद्र हे ड्रैगन पैलेस टेम्पल च्या माध्यमातुन रविवार दि. १८/०४/२०२१ पासुन शुभारंभ करण्यात आले व हजारो लोकांना काढा वाटप करून लाभ देण्यात आले, परंतु आज सकाळला ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात आठ ते दहा हजार लोक आयुर्वेदिक काढा घेण्याकरिता पहाटे ४ वाजता पासुन रांगेत असतांना सुध्दा पोलीस निरीक्षक श्री. मेंढे यांच्या उपस्थितीत बलपूर्वक लोकांना हुसकावण्यात आले व काढा वितरण केंद्रात मोठया प्रमाणात पोलीसांनी आत शिरून स्वयंसेवक व कर्मचा-यांसोबत शिवीगाळ करून अपमानित करून काढा वितरण केंद्र बंद केले.
त्यामुळे हजारो लोक काढयापासुन वंचित झाले. सद्दाच्या कोरोना काळात या काढयाची जनतेला अत्यंत आवश्यकता असल्याने पोलीसांकडून आज घडलेला प्रकार अतिशय निंदनीय व गरजुंना वंचित करणारा आहे. पोलीसांनी केलेल्या या कार्यवाहीचा निषेध करत असतांना येत्या २४ तासात शासनाने व पोलीस प्रशासनाने ड्रैगन पैलेस टेम्पल येथील काढा वितरण केंद्र सुरू करण्याची पुन्हा परवानगी, सहकार्य व संरक्षण न दिल्यास बुधवार पासुन बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिला आहे.
ड्रैगन पैलेस टेम्पल येथील काढा वितरण केंद्र बंद पाडल्याने हजारो लोक वंचीत होत असल्यामुळे या केंद्राला परत सुरू करण्याच्या संदर्भात शासनाने व प्रशासनाने योग्य सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *