कामठी येथील विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरातुन होणार डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा काढा वाटप.

अँड. सुलेखाताई कुंभारे यांचे कोरोनाबाधीत रूग्णांच्या मदतीकरिता महत्वपूर्ण पाहूल.

कामठी ता.प्र दी.१८:- उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या काढयामुळे अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत असतांना महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय बंद करण्याचे आदेश दिले होते. माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकाराने हे आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी डॉ. प्रज्ञा मेश्राम याच्यावर झालेला अन्याय दुर करण्याकरिता पुढाकार घेवून गुरवार दि. 15/04/2021 ला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सिविल लाइन येथील कार्यालयात भेट घेतली व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढयाने अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाले असल्यामुळे हे आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्या प्रमाणे महापौर यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या विनंतीला त्वरित मान्य करून आयुर्वेदिक चिकित्सालय सुरू करण्याची परवानगी दिली.
शुक्रवार दि. 16/04/2021 ला माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे उत्तर नागपुर येथील आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्यात आले. या प्रसंगी डॉ. प्रज्ञा मेश्राम व श्री. युवराज मेश्राम यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले. या वेळी हजारो उपस्थितांनी आनंद व्यक्त करित एकच जयघोष केला.
मोठया संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागपुर जिल्हा हा हॉस्पॉट झाला आहे. शासकीय व खाजगी रूग्णालयात बेडस् उपलब्ध नाहीत, इंजेक्शन चा तुटवडा होत असल्यामुळे कोरोना रूग्ण वनवन फिरत आहेत. अतिशय गरीब कोरोनाबाधीत रूग्ण महागडया खाजगी रूग्णालयातुन उपचार घेवू शकत नाहीत, अश्या परिस्थितीमध्ये डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा हा एक मौलाचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. पन्नास हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रूग्णांनी या आयुर्वेदिक काढयाचा लाभ घेवून कोरोना मुक्त झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयासमोर तिन ते चार हजार लोकांची गर्दी होत असल्यामुळे सोशल डीस्टसींगचे पालन करने कठीन झालेले आहे. ही सर्व परिस्थिति लक्षात घेता डॉ. प्रज्ञा मेश्राम व श्री. युवराज मेश्राम यांच्या विनंती वरून विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातुन आयुर्वेदिक काढा वाटप करण्याकरिता माजी राज्यमंत्री व ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी परवानगी दिली.
उल्लेखनीय आहे की, कोरोनाबाधीत रूग्ण किंवा वेंटीलेटर व ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या गंभीर रूग्णांचा उपचार हा उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये पूर्वी प्रमाणेच सुरू राहील. या गंभीर रूग्णांना योग्य उपचार मिळावा व रूग्णांची गैर सोय दुर व्हावी या करिता फक्त आयुर्वेदिक काढा वितरित करण्याचे केंद्र हे ड्रैगन पैलेस टेम्पल च्या माध्यमातुन होणार आहे.
विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल च्या परिसरातुन रविवार दिनांक 18/04/2021 पासुन सायंकाळी 5 ते 8 वाजे पर्यंत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी तयार केलेला काढा वाटप करण्यात येईल. या ठिकानी कोरोनाबाधीत रूग्णांना न येता कोरोनाबाधीत रूग्णांच्या परिवारातील सदस्यांना नावाची व आधार कार्डची नोंदनी केल्यावर टोकन प्रमाणे 150 रूपयात आयुर्वेदिक काढा उपलब्ध करून देण्यात येईल. सद्ध्या सुरू असलेल्या संचार बंदीला लक्षात घेता व सरकारनी दिलेल्या निर्बंधाप्रमाणे परिसरात येणा-या प्रत्येक व्यक्तींनी मास्क लावून व सोशल डिस्टेसींगचे पालन करून या आयुर्वेदिक काढयाचा लाभ घ्यावा असे आव्हान ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *