सामाजिक न्याय विभागावर “अन्याय”:- अँड. सुलेखाताई कुंभारे

कामठी ता.प्र.दी.८:- महाआघाडीने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय विभागवर अन्याय केला असुन या मध्ये सार्थी, बार्टी सारख्या संस्थेला अपेक्षा पेक्षा कमी निधिची तरतुद केल्यामुळे महाआघाडीचे अर्थमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अनुसूचित जाति जमाती या घटकांवर अन्याय केल्या असल्याचे मत अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले. मोठया प्रमाणामध्ये मुंबई ला निधि देत असतांना इंदु मिल ठिकाणी प्रस्तावित असलेल्या भव्य – दिव्य अश्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा त्यांना विसर पडला. या वरून अर्थ मंत्र्यांच्या मानसिकतेची जाणीव होत आहे.
एकीकडे मोठया प्रमाणात मंदीर, तीर्थक्षेत्र या करीता निधी उपलब्ध करून देण्यात आली. त्या बद्दल आमचे आक्षेप नाही, परंतु दुसरीकडे अजींठा, एलोरा सारख्या बुध्दीष्ठ टूरिस्ट सर्किट चा त्यांना वीसर पडला, विदर्भ – मराठवाड़ा महामंडळाला पुर्णपणे दुर्लक्षीत करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे. एकुणच महाआघाडीचे अर्थसंकल्प पक्षपाती असुन निराशाजनक आहे. असे मत मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *