कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुद्धा परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह

कामठी ता.प्र.दी.५:- उपराजधानी नागपूरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अगदी जोरात सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी उपजिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आल्या आहेत,त्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित परिचरिकेला आरोग्य विभागाच्या ( health worker ) कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या टप्प्यातच लसीकरण झाले होते.
४२ वर्षीय परिचारिकेने जानेवारी महिन्यात कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोज घेतला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विहित वेळी त्यांना लसीचा दुसरा डोज ही देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉसिटीव्ह आढळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *