कामठी ता.प्र.दी.१६:- श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी तसेच उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय कामठी यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे कामठी फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱी तसेच पदवीत्तर संशोधन करणारे विद्यार्थी यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
ही चाचणी रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट किट द्वारे करण्यात आली. एकुण १२७ कर्मचारी आणि विद्यार्थी यांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीत सर्वांची रिपोर्ट निगेटिव्ह आली.
या प्रसंगी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय माने, डॉ शबनम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, प्राध्यापक राध्येशाम लोहिया व रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांची कोरोना तपासणी निगेटिव्ह येण्यामागे शासनाने कोव्हिड-१९ करीता करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची महाविद्यालयाने वेळोवेळी केलेली अंमलबजावणी ही खरोखरच प्रशंसनीय आहे, असे यावेळी संस्थेचे सचिव श्री सुरेश भाऊ भोयर यांनी व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन केले.