आर्थिक साक्षरता कार्यक्रम व बँक मेळावा

ता.प्र.पारशीवणी:- आर्थिक साक्षरता. कार्यक्रम व बँक मेळावा. आय. डी. बी. आय.बँक
आज दि. .12/2/21 रोजी पारशीवणी तालुक्यातील दहेगाव जो. येथे गावातील उमेद एम. एस. आर. एल. एम. स्वयं सहायता महिला समुहासाठी आर्थिक साक्षरता. कार्यक्रम व बँक मेळावा आयोजित करण्यात आला जवळ जवळ 10 समुहातील 120 महिला उपस्थित होते.यावेळी त्यांना 14 लक्ष रू मंजूर करण्यात आले.याप्रसंगी सि.जी.एम.आणि.झोनल हेड श्री.राजेंद्र पुजारी सर, जि. एम. आणि.सिनियर.आर.एच.श्री.प्रसन्न मुकणे सर,सरपंच श्रीमती पूजा जनबंधू , बी. एम. एम. राजू बोरकर ,प्रभाग समन्वयक गिरीश गुजरमाले यांनी महिलांना आर्थिक साक्षरता व कर्जाचा योग्य वापर करणे,परतफेड करणे विषयी मार्गदर्शन केले.अनुलोम संस्था,आणि घरपोच कनेक्ट चे तालुका समन्वयक धर्मेंद्र दुपारे, यांनी.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ” आत्तमनिर्भर भारत” या विचार प्रेरेणेतुन घरपोच कनेक्ट ही पूर्ण पणे स्वदेशी गुंतवणूक असणारी देशातील इ-काॅमस कंपनी निर्माण झाली.आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका खेडेगावात कोणती ना कोणतीतरी एक विशिष्ट प्रकारची वस्तू प्रसिद्ध असते.ती वस्तू त्या भागापूर्ती मर्यादित प्रसिद्ध होती. पण घरपोच या कंपनीच्या ॲपमुळे. या सर्व वस्तूना संपूर्ण महाराष्ट्रात बाजारपेठ उपलब्ध झाली..
सि.आर.पी.योगिता साहारे,सुनीता हिंगणकर, बँक सखी सरिता तांदुळकर, नव प्रतिभा ग्रामसंघाचे हर्षा धांडे, बोरकर मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *