श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी येथे २१ डिसेंबर रोजी “हर्बल्स – पास्ट, करन्ट अॅन्ड फ्युचर प्रोस्पेक्टीव” या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न

कामठी ता.प्र.दी.२९:-श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी येथे २१ डिसेंबर २०२० रोजी सोसायटी ऑफ फार्माकॉग्नोसी च्या संयुक्तविद्यमाने “हर्बल्स – पास्ट, करन्ट अॅन्ड फ्युचर प्रोस्पेक्टीव” या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न.
या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. सी. के. कोकाटे, राष्ट्रीय सल्लागार, सोसायटी ऑफ फार्माकॉग्नोसी, माजी अध्यक्ष पीसीआय आणि माजी कुलगुरू के. एल. ई. बेळगाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. एन. आर. शेठ अध्यक्ष, सोसायटी ऑफ फार्माकॉग्नोसी, कुलगुरू, गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटी अहमदाबाद, हे होते. तसेच डॉ. व्ही. के. दीक्षित, नॅशनल अडव्हायझर, सोसायटी ऑफ फार्माकॉग्नोसी माजी प्रोफेसर डॉ. एच. एस. गौर विद्यापीठ सागर, डॉ. यू. के. पाटील जनरल सेक्रेटरी सोसायटी ऑफ फार्माकॉग्नोसी, प्राध्यापक डॉ. एच. एस. गौर विद्यापीठ सागर; डॉ. अरुण टी. पाटील, प्रोफेसर एस. के. बी. सी. ओ. पी कामठी, आय. एस. पी. चे स्टेट को-ओर्डीनेटर डॉ. प्रकाश इटणकर आणि आय. एस. पी. चे उपाध्यक्ष आणि सम्मेलनाचे संयोजक डॉ. मिलिंद जे. उमेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेच्या वैज्ञानिक सत्राचे वक्ता डॉ. सिद्दी वीरेशम, प्राचार्य, श्री रामचंद्र फार्मसी एस. आर. एच. ई. आर. चेन्नई, डॉ. राहुल फाटे, संचालक राहुल फाटे ग्रुप ऑफ कंपनीज व डॉ. विमलकुमार, प्राचार्य आय.टी.एम स्कूल ऑफ फार्मसी, आय.टी.एम. युनिव्हर्सिटी गुजरात, हे होते. सत्राचे अध्यक्ष पद डॉ. दिनेश चापले प्राचार्य, पी जे एलसी कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ. अभय इट्टडवार, प्राचार्य गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसी आणि डॉ. प्रकाश इटणकर, विद्यापीठातील फार्मसी विभागाचे असो.प्रोफेसर यांच्याकडे होते या वैज्ञानिक सत्रामध्ये प्रामुख्याने हर्बल्स इन डायबीटीज, कॉस्मासुटीकल्स, न्युट्रॉसुटीकल्स, हर्बल्स मेडीसीन इन लाईफ स्टाईल डिस्‌ˈऑड(र्‌) व फ्युचर प्रोस्पेक्ट इन हर्बल्स इंडस्ट्री या विषयांवर चर्चा करण्यात आली.रित्या
डॉ. मिलिंद उमेकर उपाध्यक्ष, आय. एस. पी. आणि एस. के. बी. सी. ओ. पी. चे प्राचार्य यांनी सम्मेलनाचा आढावा घेतला व उपस्थितीत पाहुण्यांचे मनापासून आभार मानले सम्मेलनाचे कोˈऑडिनेटर कमला के. चांडक असो. प्रोफेसर एस. के. बी. सी. ओ. पी. यांनी घेतलेल्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली आणि कोˈऑडिनेटर डॉ रेणुका जे. दास यांनी ही राष्ट्रीय परिषद सुरळीतपणे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय परिषद या सम्मेलनाचे एस. के. बी. सी. ओ. पी. चे मधुरा दीक्षित यांनी सुत्र संचालन केले व नेहा राऊत आणि मनीष आगलावे यांनी, यूट्यूब आणि फेसबुकवर या कार्यक्रमाचे अखंड ऑनलाइन आयोजन व थेट प्रसारण झाल्याची खात्री घेतली. या परिषदेत 1200 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. संमेलन यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल श्री. सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचा आणि सोसायटी ऑफ फार्माकोग्नॉसी व व्यवस्थापनाचे आयोजकांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *