कामठी ता.प्र.दी.२६:- श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “ *संविधान* *दिन* ” साजरा. या प्रसंगी संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थांना ऑनलाईन “ *संविधान* *प्रास्ताविकेचे* ” वाचन करवण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व मार्गदर्शन केले .
डॉ दिनेश बियानी, डॉ ब्रिजेश ताकसांडे, डॉ कमलेश वाढेर, डॉ अतुल हेमके, डॉ कृष्णा गुप्ता यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राधेश्याम लोहिया, नेहा राऊत, मनिष आगलावे, मयुर काळे यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.
प्राध्यापिका मधुरा दिक्षित यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.