कामठी ता प्र १८:-स्थानिक नवोन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील सुपारे नगर कॉलोनी रहिवासी फुटाणे मुरमुरे विकणाऱ्या एका विधवा महिलेच्या घरातून एक एक पैसा जमा करून गोळा केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने व नगदी ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यानी कुलूपबंद घरातून चोरून नेल्याची घटना ८ नोव्हेंबर ला घडली असता यासंदर्भात पीडित फिर्यादी फुटाने मुरमुरे विकणारी विधवा महिला वंदना डायरे वय ५२ वर्षे रा सुपारे कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवीत तपासाला दिलेल्या गती वरून अवघ्या एक आठवड्याच्या आत या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून तीन महिला आरोपीना अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेले सोन्याची चैन ३० हजार रुपये , दोन सोण्याच्या अंगठ्या १२ हजार रुपये , पिठीव मणी ६ हजार रुपये , चांदीची पायपटी ५ हजार रुपये , चांदीचा कुरकुडा ३ हजार रुपये , व सोन्याचे मंगळसूत्र ३० हजार रुपये व नगदी ७ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आला असा एकूण ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याच्या तपास प्रकरणात कामठी तील एका स्वर्णकाराला ताब्यात घेऊन चोरीचा विकत घेतलेला माल जप्त करून त्यांच्याकडून करण्यात आलेल्या चिरीमिरीतुन त्या स्वर्णकाराची पाठराखण करीत झोपडपट्टीत राहणाऱ्या तीन महिला आरोपीवर कायदेशीर कारवाही करन्यात आली मात्र तपासात घेतलेल्या स्वर्णकाराची पाठराखण करण्यात आल्याचो चर्चा परिसरात रंगत असल्याने सुपारे कॉलोनी च्या या घरफोडी प्रकरणात पोलीसाना प्राप्त यश प्रकरणात खुद्द पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
अटक तीन महिला आरोपी मध्ये बाली कांबळे वय ३५ वर्षे रा अब्दुल्ला शाह दर्गा जवळ कामठी, माला तडसे वय २५ वर्षे व सपना वानखेडे वय २५ वर्षे रा अब्दूलला शाह नगर कामठी असे असून ही यशस्वी कारवाही गुन्हे प्रकटीकरण पथकातील विनायक आसटकर, मनोहर राऊत, निलेश यादव,
श्रीकृष्ण दाभने, रोशन पाटील, ललित शेंडे यांनी केले आहे.
भुमिका संशयास्पद वाटत आहे तेव्हा शिस्तप्रिय असलेले पोलिस आयुक्त अमीतेश कुमार या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी येथील अब्दुल्ला शाह दर्गा रहिवासी जागरुक नागरीक करीत आहेत.