फायनान्स चा डाव फसला, ३ आरोपी ताब्यात , 14 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र १८:-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पाश्वर भूमीवर कामगार नगर कामठी रहिवासी एका मुस्लिम समाजातील तरुणाने त्याच्या जमातीतील लोक गरजू व्यक्तींच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमाँ करणार असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा करून त्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडील गोळा केलेले कागदपत्रे हिरो फायनान्स च्या कामी आणून त्यांच्या नावाने दुचाकी फायनान्स केले असल्याचा प्रकार नुकताच उघडकिस आला असून ज्याच्यानावाने हे दुचाकी फायनान्स हिरो फायनान्स च्या नावाखाली खुशबू मोटर्स येथून केले मात्र फायनान्स केलेली महिण्याची किस्त वेळेवर न पोहोचल्याने किस्त बाऊन्स झालल्या रकम वसूल करण्यासाठी वसुली एजेंट घरी आला असता आपण दुचाकी फायनान्स न केल्यावरही आपल्या नावावर कुणीतरी दुचाकी फायनान्स केल्याचे लक्षात येतच फसवणूक झालेले पीडित फिर्यादी ललीत बिगोले वय ३५ वर्षे रा रणाळा कामठी ने स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवीत या प्रकरणातील तीन आरोपीना ताब्यात घेत अटक करून त्यांच्याकडून दिशाभूल करून फसवणुकीच्या माध्यमातून बनावट फायनान्स केलेले २४ दुचाकी जप्त करण्यात आले यानुसार १४ लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अटक तीन आरोपी मध्ये गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार जिशात खान इब्राहिम खान वय २८ वर्षे, हिरो फायनान्स कंपणोचा एजेंट मोहम्मद तन्वीर अखतर वय ३० वर्षे तसेच उमेरुद्दीन अन्सारी वय ३० वर्षे रा कामठी चा समावेश असून या प्रकरनात अजूनही गौपयस्फोट होणार असून काही प्रतिष्ठित नागरिक सुद्धा यामध्ये समावेशक असून त्यांचा सुद्धा लवकरच तपास लागणार असून गौप्यस्फोट होणार आहे.
ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल , एसीपी अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल, दुय्यम पोलीस निरीक्षक राध्येश्याम पाल , ए पी आय कर्नाके, डी बी स्कॉड चे मंगेश यादव, मंगेश लांजेवार, पप्पू यादव, राजेंद्र टाकलीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, सुरेंद्र शेंडे, संदीप गुप्तता, विनायक आसटकर, मनोहर राऊत, कृष्णा दाभने, निलेश यादव, रोशन पाटील, ललित यादव,दिलीप कुमरे, वेदप्रकाश यादव, मंगेश गिरी ,राहुल ठाकूर , आशिष भुरकुंडे यांनी केले असून पुढील तपास सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *