ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापना दिनी लोकांकरिता खुले करणार..

ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात…

३० नोव्हेंबर २०२० ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्थापना दिन सोहळा

कामठी ता.प्र.दी.१६:-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात मार्च २०२० पासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. शैक्षणिक संस्था सह सर्व धार्मिक स्थळ सुद्धा लोकांच्या प्रवेशाकरिता बंद करण्यात आले होते. पवित्र दीक्षाभूमी सह विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल सुद्धा लोकांकरिता बंद ठेवण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बुद्ध जयंती. धम्मचक्र प्रवर्तन ईत्यादी कार्यक्रम मर्यादित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे संपन्न झाले. ड्रॅगन पॅलेस टेम्पल प्रवेश बंद असल्यामुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या छतावर असलेले जुने इटालियन मोजॅक स्टाईल पूर्ण पणे काढून नवीन इटालियन मॉजेक टाईल्य लावण्यात आले.या कामगिरीत करिता राजस्थान येथील कुशल कामगारांनी हे स्टाइल्स लावण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून केले व हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील २० वर्षा पूर्वी ४ एकर जागेवर लावण्यात आलेले लॉनचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तसेच जुना लॉन काढून नवीन लॉन लावण्याचे काम ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या समोर असलेल्या बगीच्याचे सुशोभीकरण करण्यात आले. ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेले फवाऱ्याचे
नूतनीकरण वर रंग बिरंगी लाइटिंग ने सजविण्यात आले आहेत. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट देणाऱ्या पुरुष व महिलांन करिता वेगवेगळे नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर हा नवीन स्वरूपात लोकांकरिता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड. सुरेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल चे काही कामे अंतिम टप्प्यात असल्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे सोमवार पासून सुरु न करता ३० नोव्हेंबर २०२० रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पल चा २१ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. याच वर्धापन दिना पासून लोकांकरिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये प्रवेश सुरू करण्यात येईल. अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष ऍड. सुरेखाताई कुंभारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *