कामठी ता.प्र.दी.२७:-तालुक्यातील लिहीगाव ग्रामपंचायत च्या आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप गटाच्या सुनीता दिनेश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली
लिहीगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनिता बोरकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज उपसरपंच पदाची निवडणूक झाली असता भाजप गटाच्या सुनीता दिनेश ठाकरे ह्या बिनविरोध निवडून आल्या बिनविरोध निवडणूक झाल्याचे निवडणूक अधिकारी अरविंद अंतुरकर यांनी जाहीर करताच सरपंच गणेश झोड यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सूनिता दिनेश ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवि निकाळजे, सुनिता बोरकर, सुषमा ठाकरे , हरिषनिकाळजे, विशाखा बोरकर ,कृष्णराव ढेगरे ,दुर्गा ठाकरे ,कंटिराम बोरकर, उमराव हिवसे ,रवी बोरकर, पद्माताई निकाळजे ,जामुवंत ठाकरे ,राजू ढेगरे ,प्रभाकर ठाकरे, राजेंद्र बोरकर ,शांताराम ठाकरे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरविंद अंतूरकर, ग्राम विकास अधिकारी श्याम उचेकर त्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली