डॉ.प्रेम हारोडे यांचे निधन मौदा : ता.प्र. तालुक्यातील चिचोली येथिल सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी डॉ.प्रेम शालीकराम हारोडे (६२ वर्षे) यांचे आज नागपूर येथिल रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मागील चाळीस वर्षे त्यांनी चिचोली सारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा केली.कोरोना काळातही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही म्हणून नुकताच त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी रेणुका प्रेम हारोडे, एक मुलगा,एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. नागपूर येथील स्मशान भूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.