केळवद ता.प्र.दी.पोलिस स्टेशन केळवद येथे दिनांक 16/10/2020 रोजी सकाळी 12.00 ते 13.00 वा. दरम्यान मा. श्री. अशोक सरंबळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर व श्री. सुरेश मट टा मी ठाणेदार, पोलिस स्टेशन केलवद यांचे मार्गदर्शनात आगामी सण-उत्सव नवरात्र, दसरा , रावण दहन , संबंधाने प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती, पोलीस पाटील, नवरात्र मंडळ, यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकी दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असल्याने घराबाहेर न पडता घरातच उत्सव करण्याबाबत व मूर्ति स्थापना केल्यास त्या ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही या विषयी व सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रम भजन, गरबा, दांडिया अशा कार्यक्रमावर शासनाने बंदी घातलेली आहे असे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत जेणेकरून गर्दी होणार नाही या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोरोना त्रिसूत्री कार्यक्रम आयोजित करून शपथ घेण्यात आली. तसेच सर्व पोलीस पाटील यांना कोरोना काळात केलेल्या कामगिरी बद्दल सन्मान पत्र देण्यात आले. बैठकी ला 60 ते 70 नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *