रोहयोसाठी जाँब कार्ड नोंदविण्याची मोहिम शासनाची यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्याने राबवावी

उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे

मुंबई, शहर प्र. दि.१५ :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे सध्या कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणेने समन्वयाने कामे करुन समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे सांगितले.

रोजगार हमी योजनेसंदर्भात विविध विषयांवर दुरदुश्य व्दारे आयोजित वेबीनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी रोजगार हमी योजने प्रधान सचिव नंदकुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोजगार हमी योजनेचे आयुक्त श्री.नायक यांच्या सह राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी श्री रमेश भिसे,श्री किशोर मोघे, श्री.अरुण शिवकर, श्रीमती सीमा कुलकर्णी, श्रीमती शुभदा देशमुख, श्री संतोष राऊत, श्रीमती कुशावती बेळे, श्रीमती चंद्रकला भार्गव आदी उपस्थित होते. *मा.उपसभापती यांनी आयोजित केलेली ही रोहयो विभागासोबतची तिसरी बैठक असुन पेण तालुक्यात १०७ शेततळी करण्यात आली असुन ३००० महिला मजुरांना संघटित करुन काम मिळवून देण्यात यश आल्याचे अरुण शिवकर यांनी सांगितले*
श्रीमती गो-हे म्हणाल्या,ग्रामीण भागात महिला मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील कामेही उपलब्ध आहेत,परंतु जाणिवजागृतीचा अभाव जाणवत आहे.त्यामुळे राज्यात जाँब कार्ड नोंदणी अभियान पंधरवडा कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मजूरांना विविध फाँर्म कसे भरावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणकोणती काम करता येतात.सार्वजनिक कामे कोणती,वैयक्तिक कामे कोणकोणती आहेत आदीसंदर्भात माहिती या जाणिवजागृतीमध्ये करण्यात येणार आहेत.महिला मजूरांना या विषयी माहिती करून देणे गरजेचे आहे, म्हणून त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

यापुर्वी पावसाळ्यात राज्यातील काही भागात पुर परिस्थिती गंभीर झाली होती. त्याठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती दुरुस्ती आणि गाव स्वच्छतेची कामे करण्यात आली होती. याहीवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.पुर परिस्थितीही निर्माण त्यामुळे याहीवर्षी रोहयो अशी अंतर्गत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुन्हा रोहयो अंतर्गत कामे करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मा.ना.ऊद्धवसाहेब ठाकरे, मा.ना.अजितदादा पवार, मा.ना.संदिपान भुमरे यांना या सर्व संकल्पनेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ऊपसभापती नीलमताई गोर्हे यांनी सांगितले.

ज्या भागात मजुरांना जाँब कार्ड देण्यासाठी अधिका-यांनी सहकार्य केले नाही. त्या अधिका-याची चौकशी लावली जाईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल .ज्या ठिकाणी कामांची चौकशी सुरू आहे. तेथील पुढील कामे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
रोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी राज्य आणि राज्यातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कृषी विभागाचे सचिव श्री डवले यांनी कृषी विभागाअंतर्गत रोहयोचे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.रोहयो आयुक्त श्री.रंगा नायक यांनी बैठकीतील सुचनांवर पुर्णपणे कार्यवाही असे सांगितले. रोहयोतुन आँक्टोबर २० मध्ये २० लाख मजुरांना तर एकुण ७५५ कोटी रुपयांची मजुरी देण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *