माझे कुंटुब, माझी जवाबदारी मोहीम गोंडेगाव राबविण्यात येत आहे

कन्हान ता.प्र.दी.१५ : – ग्राम पंचायत गोंडेगाव येथे माझे कुंटुब, माझी जवाबदारी मोहीम राबविण्यात येत असुन नेहरू युवा केंद्रा चे स्वयंसेवक हयानी सक्रिय सहभाग देत आहे.
ग्राम पंचायत गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे यां च्या मार्गदर्शनात गोंडेगाव येथे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कस, आंगणवाडी से विका हयाना मदती करिता नेहरू युवा केंद्र नागपुर चे स्वयंसेवक कमलेश प्रका श गजभिये सामोर येऊन आरोग्य कर्म चारी हयांच्या सोबत घरो घरी जाऊन थर्मल स्कॅनिंग, ऑक्सी मिटर ने तपास णी, आरोग्य सेतु, मास लावुन सोशल डिस्टसिंगचे पालन करित गावातील नाग रिकात कोरोना आजारा पासुन कसे सुर क्षित राहता येईल तसेच लक्षणे असणा-या ना कसे या आ जारातुन बरे होता येते याविषयी जनजागृती करून कोरोना आ जाराची भिती न बाळगता नियमाचे काटे कोरपणे पालन करून कशी मात करता येते या विषयी माहीती व मार्गदर्शन कर ण्यात येत आहे. या मोहीमेत आशा वर्क स आम्रपाली पाटील, आंगणवाडी सेवि का छाया राऊत, स्वयंसेवक कमलेश ग जभिये सेवाकार्य करित आहे.तसेच यात युथ क्लबचे सदस्य ऋृषभ गजभिये,रोमी गजभिये, सुरज गजभिये, राज वाघाडे, गणेश बोबडे, रितेश लांजेवार, अमन पहाडे, सीमा गजभिये, एकता गजभिये आदी सुध्दा उपस्थित राहुन सहकार्य करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *