नागपूर येथील युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले,आंतरराज्य गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करणेबाबत गृहमंत्री यांना निवेदन ना.डाॅ.नीलम गोऱ्हे

नागपुर शहर प्र.दी.१२:- आरोपी शहजाद रमजान वाणी, आरोपीचे वय ३० याने २४ वर्षाच्या नागपूर येथील युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते व दिनांक:११ डिसेंबर २०१७ ते दिनांक: ३१ ऑक्टोबर २०१९ या काळात तिला ब्लँकमेलींग करत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना एस.जी.एस मॉल पुणे येथे दिनांक: १२ डिसेंम्बर २०१७ रोजी घडली असून सदरील गुन्ह्याची नोंद ‘सहकारनगर,पोलीस स्टेशन, पुणे मध्ये दि ०२ जुलै २०२० रोजी गुन्हा आरोपीवर दाखल आहे. तसेच आरोपीच्या भाऊ श्री शेषबाझ वाणी व त्यांचे कुटुंबीय यांनी ही दि ०८ फेब्रुवारी २०२० रोजी युवतीस मारहाण ही केली आहे.
सदरील आरोपीस ९० दिवस होऊनही अद्यापही अटक झालेली नाही.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी घटनेविषयी आवश्यक कार्यवाही करणेस संबंधित तपास अधिकारी यांना सूचना द्याव्यात तसेच आरोपीस तात्काळ अटक करावी व आरोपीला जमीन मिळणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेणेस सूचना द्यावी, या घटनेचा तपास कमीत कमी वेळेत पूर्ण करून याबाबतची चार्जशीट न्यायालयात दाखल करावी, यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिलजी देशमुख तसेच पोलीस महासंचालक श्री. सुबोध जयस्वाल व पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता यांना पत्र देऊन गुन्ह्यातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *