कोरोना रुग्णाच्या बिलावरून तणाव, नातेवाईकाणी केला रास्तारोको

कामठी ता.१० ऑक्टोबर:- कामठी कळमना मार्गावरील खुशबू मोटर समोरील एका खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणाच्या बिलावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बिलावरू झालेल्या वादातून तणाव निर्माण होवून मृदेह मिळण्याच्या मागणी साठी नातेवाईकांनी सायंकाळी 5 वाजता सुमारास रास्तारोको केल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प पडली होती नवीन कामठी चे ठाणेदार संतोष बकाल घटनास्थळी येवून मध्यस्ती केल्याने तणाव शांत झाला
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश महादेव तांबे वय 48 राहणार लष्करीबाग नागपूर या कोरोना रुग्णाला नातेवाईकानी 28 दिवसांपूर्वी उपचारासाठी खाजगी कोविड सेन्टर मध्ये भर्ती केले होते उपचारादरम्यान आज शुक्रवारला सकाळी 9,30 वाजता सुमारास सतीश तांबे चा मृत्यू झाला उपचारादरम्यान नातेवाईकाणी 3 लाख 50 हजार रुपये हॉस्पिटलमध्ये जमा केले होते आज पुन्हा डॉक्टरांनी मृतकाचे नातेवाईकांना आपण 4 लाख 95 हजार रुपये भरणार नाहीत तोपर्यंत मृतदेह देणार नसल्याचे सांगितल्यामुळे नातेवाईकांची बिलाच्या रकमेमुळे तारांबळ उडाली नातेवाईकांनी आणखी 50 हजार रुपये देतो मृतदेह देण्यासाठी विनवणी केली परंतु डॉक्टरांनी पूर्ण पैसे जमा केल्या शिवाय मृतदेह देण्यास नकार दिला, मृतकाचे नातेवाईक सुरेन्द्र खंडारे यांनी पैशासाठी मृतदेह फेत नसल्याची तक्रार नवीन कामठी पोलीस स्टेशन व तहसीलदार कामठी यांना लेखी निवेदन देऊन मृदेह सदर कोविड हॉस्पिटल चे बिल कमी करून मृतदेह देण्याची मागणी केली , 5 वाजले तरी डॉक्टराणी मृतदेह न दिल्यामुळे नातेवाईकांनी हॉस्पिटल समोर रास्तारोको सुरू केले नवीन कामठी ठाणेदार संतोष बकाल, दुय्यम निरीक्षक राधेश्याम पाल घटनास्थळी येऊन नातेवाईक व डॉक्टरांन सोबत मध्यस्ती समजूत करून पुन्हा नातेवाईका कडून 1 लाख रुपये दिल्यावर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांना दिले नातेवाईकांनी डॉक्टरांना बिल मागितले असता दोन दिवसांनी नातेवाईकांना बिल देणार असल्याचे सांगितले
### जुलै महिन्यात याच खाजगी हास्पिटल मध्ये एका कोरोना तरुण रुगणाचा मृत्यू झाला होता त्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टरांची तक्रार केली असता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार अरविंद हिगे यांनी या हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली होती कामठीतील काही खाजगी कोविड सेन्टर हॉस्पिटलमध्ये कोरोना चे नावावर मोठ्या प्रमाणात नागरिकांना कडून लुबाडणूक होत असून अशा खाजगी कोविड हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *