अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.
कन्हान ता.प्र.दी.६: – शासकीय कर्मचारी तसेच जि ल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजुरी संदर्भात महाराष्ट्र रा ज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम१९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासननिर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहुन आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ आक स्मिक ५गंभीर आजारावर खाजगी रुग्णा लयात घेतलेल्या उपचारांवरील खर्चाची प्रतीपुर्ती वैद्यकीय देयका द्वारे करण्यात येते.
सध्या कोरोना महामारीचे संकट संपुर्ण महाराष्ट्र भर आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थे चे कार्मचारी या महामारीच्या निर्मुलनासा ठी विविध पातळीवर जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.शासकीय कर्तव्य पार पाडतांना रोगाची लागण झाल्यास सध्या बेडचा तुटवडा व इतर अत्यावश्यक बाबीसाठी कर्मचाऱ्यांना पर्यायी खाजगी रूग्णाल यात उपचार घ्यावे लागत आहेत. कोव्ही ड -१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्तीसा ठी शासनाने विर्निदिष्ट आजारामध्ये समा वेश नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सा मना करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकी य खर्चाच्या प्रतिपुर्ती अंतर्गत सद्यस्थिती त गंभीर आजाराच्या यादीत कोव्हीड – १९ चा समावेश करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा ने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचेकडे केली आहे. या व्यतिरिक्त सारी, स्वाईन फ्लू, लिव्हर प्रत्यारोपण, डेंग्यु , सोरायसिस इ. रोगांचा समावेश करण्याबाबत विनंती केली आहे. या माग णीचे स्वागत गोपाळराव चरडे, रामुजी गोतमारे, सुनील पेटकर, सुभाष गायधने, डी.व्ही.वंजारी, प्रकाश बांबल, धनराज बोडे, आनंद गिरडकर, निलेश राठोड, पंजाब रोठोड, लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे, उज्वल रोकडे, अशोक बावन कुळे, आशा चिखले, सिंधु टिपरे, वंदना डेकाटे, सुनंदा देशमुख, नंदा गिरडकर, श्वेता कुरझडकर, हरिश्चंद्र रेवतकर, मनो ज बोरकर, तुषार चरडे, गाढवे, वसंत बलकी, महिपाल बनगैया, संतोष बुधबा वरे, विलास वनकर, अर्जून धांडे, अशोक हटवार, अनिल पाटील, चंद्रशेखर वाघ व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.