कन्हान ता.प्र.दी.५ : – महाराष्ट्र शासन कृषी विभागा व्दारे सर्व शेतकरी बंधुना जाहीर आवाह न केले आहे की, सोयाबिन बियाणांची पुढील वर्षी तुटवडा होण्याची दाट शक्य ता असल्याने करू नका बाजारातील सोयाबिन बियाण्यावर खर्च, घरचे गुणव त्तापुर्ण सोयाबिन बियाणे वापरून चला आत्मनिर्भय बनुया.
यावर्षी निसर्गाने साथ बरोबर न दिल्या ने सोयाबिन पिकाच्या उत्पन्नाची घट पाहता पुढील वर्षी सोयाबिन बियाणांची तुटवडा होण्याची दाट शक्यता असल्या ने शेतक-यांनी आपल्या शेतातील सोया बिन मळणी करताना आरपीएम ३०० ते ५०० ठेवावे, या अनुषंगे सोयाबिन बिया णे फुटणार नाही. याची दक्षता घ्यावी. मळणी नंतर बियाणांसाठी राखीव ठेवले ले सोयाबिन २ ते ३ दिवस सावली मध्ये वाळवावे. ज्या अनुषंगे बियाण्यातील आद्रता ही ०९ ते १२ % कमी असावी. बियाणांची साठवणुक करतांना बियाणां च्या बॅग कोंदड जागी न ठेवता हवेशीर जागेत ठेवावे, जेणे करून बुरशीची वाढ होणार नाही.एकावर एक जास्तीत जास्त तीन बॅग साठवताना ठेवण्यात याव्यात. किंवा बॅग भिंतीला लावुन उभी ठेवण्यात यावी. पोत्याची थप्पी जमिनी पासुन १० ते १५ सेंटी मीटर उंचीवर लाकडी फळ यावर लावावी. पेरणी करण्यापुर्वी उगव ण क्षमता तपासुनच पेरणी करावी.अश्या प्रकारे घरच्या घरी दर्जेदार गुणवंत्ता पुर्ण व चांगली उगवण शक्ती असलेले बियाणे निर्माण करून “घरचे गुणवंत्ता पुर्ण सोयाबिन बियाणे वापरून आत्मनिर्भय बनुया.”
” करू नका बाजारातील सेयाबिन बियाण्यावर जास्त खर्च, चला वापरूया गुणवंत्ता पुर्ण बियाणे आपल्याच घरच.” असे आवाहन पारशिवनी तालुक्यातील शेतकरी बंधुना मंडळ व तालुका कृषी अधिकारी जी बी वाघ हयानी केले आहे.