दोन तासांच्या चिमुकलीला रस्त्यावर फेकल्याची निर्दयी घटना नागपुरातील सावनेर येथे घडली आहे…
सावनेर येथून जवळच असलेल्या एका वर्दळीच्या मार्गावर स्त्री जातीचे हे बाळ आढळून आलं आहे…
सावनेर ता.प्र.दी.३:- रस्त्याच्या बाजूला बाळ पडून असल्याची माहिती मिळताच…येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बाळाला ताब्यात घेऊन पोलिसांना माहिती दिली…
या प्रकरणी सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहे…
अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा किंवा ती मुलगी आहे म्हणून… कुटुंबीयांनी हे कृत्य केलं असल्याची परिसरात चर्चा आहे…