मौदा ता प्र। माझे पती कंपनीत कामावर असताना कम्पनी प्रशासनाने योग्य सुरक्षा न दिल्यामुळे आज माझ्या पतीला अपंगत्व आले असा आरोप चिरवा येथील सौ संगीता लक्ष्मण उरकुडे यांनी लेखी पत्रकातून केली आहे आपला पतीला अपंगत्व आल्यामुळे आज माझ्या कुटुंबाचा उदरनिव्हचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कम्पनी प्रशासनाने माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी सौ संगीता जांभुले यांनी केली आहे
सदर महिलेचे पती श्री लक्ष्मण जांभुले हे मौदा तालुक्यातील वदोडा येथील पी आर रोलिंग मिल्स या कम्पणीत अकुशल कामगार म्हणून कार्यरत होते दि 5/7/२०२० ला कम्पणीत मशीनवर काम करीत असताना त्यांचा मशीन मध्ये हात गेला त्यावेळी दुसऱ्या हाताने मशीनमध्ये गेलेला हात काढत असताना दुसरा हात पण जखमी झाला दोन्ही हाताची बोटे तुटलेली होती त्या। वेळी सदर कंपनीने त्यांना नागपूर येथील खाजगी दवाखान्यात भरती केले व उपचाराचा पूर्ण खर्च कम्पनी प्रशासनाने केला दोन्ही हात निकामी झाल्यामुळे त्यांना कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले त्यांची आर्थिक परिस्तिथी अतिशय हालकीची असल्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा गंभीर प्रश्न त्यांचेपुढे निर्माण झाला आहे त्यामुळे कम्पनी प्रशासनाने आपणास आर्थिक मदत करावी अशी मागणी अपंगत्व आलेल्या कामगाराच्या पत्नीने कम्पनी प्रशासनाकडे केली आहे