युवक काँग्रेस रामटेक विधानसभा व कांन्द्री कन्हान व्दारे कॅंडल मार्च

कन्हान ता.प्र.दी.२: – उत्तर प्रदेश च्या हाथरस येथे झालेल्या दुर्दैवी दुष्कर्मा च्या विरोधात व पिडीतेच्या आत्मास शांती करिता युवक काँग्रेस रामटेक विधानसभा व कांन्द्री कन्हान व्दारे कांद्री येथे कॅंडल मार्च काढण्यात आला होता.
गुरूवार दि.१आक्टोबर २०२० ला रात्री ८. ३० वाजता गांधी चौक कांद्री येथुन कॅंडल मार्च काढुन पिडीतेच्या आत्म्यास शांती करिता प्राथना करून दुर्दैवी दुष्कर्माचा विरोध करण्यात आला. पिडीतां च्या परिवाराल माहित न करता रात्रीच अंतिम संस्कार करण्या मागचे कारण काय ? याला कोन जबाबदार आहे अशे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे. या सर्व गोष्टीचा विरोध करत युवक कांग्रेस कांद्री व्दारे तिव्र निषेध केला व लवकरात लवकर कार्यवाही करुन अारो पिंना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी ग्रा प कांद्री सरपंच बळ वंत पडोळे उपसरपंच श्यामकुमार बर्वे , ग्रा प सदस्य धनराज कारेमोरे, राहुल टेकाम, कॉग्रेस कांद्री अध्यक्ष ओमप्रका श भोयर, मोहसीन खान, रामटेक विधान सभा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष कुशल पोटभरे, रामटेक विधानसभा महासचिव गौरव भोयर, युवक काँग्रेस कांद्री अध्यक्ष अक्षय देशमुख, उपाध्यक्ष पारस मरघडे, सचिव निलेश गि-हे, निकेश मेश्राम, गणेश सरोदे, निखिल तांडेकर, इंद्रपाल वंजारी, कार्तिक थोटे, आकाश रहिले, ईश्वर कामळे, गजानन, मनोज बावनकु ळे, हटवार, दिनेश नारनवरे, केतन समरी त, सुरज गि-हे, राहुल जैसारे, सुजल धारोड, विकास ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *