पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या मुख्य अभियंत्यांचा जाहिर निषेध

वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत पत्रकारांना येण्यास मज्जाव
पत्रकार संघटनेने केली कार्यवाहीची मागणी
पत्रकार संघटनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
खापरखेडा-प्रतिनिधी दी.२
समाजाच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या स्थानिक पत्रकारांना वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे त्यामूळे पत्रकार वर्गात नाराजीचा सूर उमटला असून खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता व वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांचा स्थानिक पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध केला असून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली आहे यासंदर्भात पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
स्थानिक पत्रकार संघटनेचे सदस्य बंडूभाऊ चौरागडे हे वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत आवश्यक बातमी कव्हर करण्यासाठी १ ऑक्टोबर गुरुवारला सकाळी १० च्या सुमारास गेले होते मात्र यादरम्यान त्यांना वीज केंद्रात कार्यरत असलेल्या दोन-तीन खाजगी सुरक्षा रक्षकांनी गाठून वरिष्ठांच्या आदेशाने पत्रकारांना वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत येण्यास मज्जाव केला असल्याचे सांगून त्यांना प्रकाशनगर वसाहतीच्या बाहेर जाण्यास सांगितले.
पत्रकारांना वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत प्रवेश नाकारने म्हणजे लोकशाहीची थट्टा करणारा निर्णय असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत देना बँक, इंडेन गॅस एजन्सी, विजेचे बिल भरने, कामगार कल्याण केंद्र, शाळा महाविद्यालय, व्यापारपेठ, महावितरण कंपनीचे कार्यालय, राम मंदिर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकार बंधूं प्रकाश नगर वसाहतीत जातात मात्र आज पर्यंत कोणालाही आडकाठी करण्यात आली नाही मात्र अलीकडे प्रकाशनगर वसाहत स्थानिक पत्रकारांना प्रकाशनगर वसाहतीत येण्यास मज्जाव करण्यात आला असल्यामुळे प्रकाशनगर वसाहत कधी पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले? असा प्रश्न निर्माण झाला आहे वीज केंद्रासह प्रकाशनगर वसाहतीत अनेक कर्मचारी व त्यांचे कुटूंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर काहींचा मृत्यू झाला आहे यासंदर्भात अनेक वर्तमान पत्रात बातम्या झळकल्या आहेत शिवाय प्रकाश नगर वसाहतीत अनेक समस्या तळ ठोकून आहेत मात्र उपाय-योजना शून्य आहेत त्यामुळे स्थानिक वीज केंद्र प्रशासनाचे पितळ उघडे पडण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक पत्रकारांना वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत येण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप पत्रकार बंडूभाऊ चौरागडे यांनी केला आहे पत्रकारांकडे समाजाचा चौथा आधारस्तभ म्हणून बघितले जाते सर्व सामान्य जनतेला दैनिकाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकाराला प्रकाशनगर वसाहत प्रतिबंधित क्षेत्र नसतांना सूडबुद्धीने प्रवेश नाकारण्यात येत असल्याची चर्चा आहे त्यामूळे पत्रकारांचा आवाज दडपणाऱ्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांचे मुख्य अभियंता व वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांचा स्थानिक पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना २ ऑक्टोबर शुक्रवारला निवेदन देण्यात आले आहे यावेळी वरिष्ठ पत्रकार दिवाकर घेर अमर जैन, सुनील जालंदर, राजेश खंडारे, बंडूभाऊ चौरागडे, श्रीराम सातपुते, खुशाल इंगोले, विनोद गोडबोले यांच्यासह माजी समाजकल्याण सभापती दिपक गेडाम, वामन कुंभारे, अशोक रामटेके, नितीन पुरी, मधुकर मोटघरे, बालू पाठराबे, वैभव येवले आवर्जून उपस्थित होते यासंदर्भात जनसंपर्क व माहिती अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *