नागपूर दि.२ ऑक्टोबर:-‘पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य क्षेत्रामध्ये रोजगार,स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन वेबीनारचे आयोजन बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १२ ते १.३० यावेळेत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभाग घेवून रोजगाराची संधी प्राप्त करावी,असे आवाहन सहायक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे.
ऑनलाईन वेबीनारमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त श्री. केशवे,जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी अमोल पुराळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल मिट लिंक https://meet.google.com/jhm-aagb-cta यावर क्लिक करावे. गुगल मिट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आक्स टू जॉईनवर क्लिक करुन वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी १० मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे, अशी सूचना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत देण्यात आली आहे.