संशयास्पद स्थितीत बिबट्याचा मृत्यू 

पारशिवणी प्रतिनिधी :- नागपूर जिल्यातील पारशिवणी तहसील अंतर्गत नयाकुंड शिवारातील एका शेतात बिबट मृतावस्थेत आढळला. 
नयाकुंड येथील ज्ञानेश्वर बारसाखरे यांच्या शेतात एक बिबट मृत पडलेला काही मजुरांना बुधवारी दुपारच्या सुमारास दिसून आले. हा परिसर रामटेक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात येत असल्यामुळे घटनेची माहिती त्यांना देण्यात आली, सायंकाळच्या सुमारास वनविभागाची चमू घटनास्थळी आली व त्यांनी बिबट्याचा पंचनामा केला. सदर बिबट्याच्या मृत्यू हा विषप्रयोगाने अथवा विद्युत प्रवाहाने झाला असल्याची शक्यता आहे.बिबट्याचे सर्व अवयव शाबूत होते असे एका वनकर्मचाऱ्याने संगितले.मात्र वनविभागाच्या चमूने कुणालाही घटनास्थळी येऊ दिले नाही. बिबट्याचे अंदाजे वय ३ वर्ष आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातलेला आहे .त्यामुळे शेतकरी बांधवात भीतीचे वातावरण पसरले आहे .तसेच पारशिवनी शहरालगत असलेल्या नदीकठावरील शेतात वाध असल्या चे दिसुन आलयाचे  बोलले जाते आहे.तयामुळे शेतात मजुर कामास येणयास नकार देत असलयाने शेतीचे कामे रखडली आहे तर या बिबट्याचा मृत्यू नेमका कश्या मुळे झाला आहे हे मात्र अध्यप स्पष्ट झाले नसून वनविभाग तपास करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *