कामठी ता.प्र.दी.३०:-श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी, कामठी येथे डॉ रावबहादूर डी लक्ष्मिनारायन यांचा ९० वा स्मृति दिवस दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.मिलिंद उमेकर यांनी डी लक्ष्मीनारायण यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन केले. श्री. आर. टी. लोहिया, डॉ. ए. टी. हेमके, डॉ. के. आर. गुप्ता, मनीष आगलावे, नेहा राऊत हे उपस्थित होते. यावेळी डॉ.मिलिंद उमेकर यांनी डी लक्ष्मीनारायण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या छोट्या भाषणामध्ये त्यांनी नमूद केले की ते सर्व कामठी येथील लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे कारण ते मुळात कामठी चे होते. नागपूर विद्यापीठात शिक्षण, संशोधन आणि विकास सुरू करण्यासाठी त्यांनी नागपूर विद्यापीठाला मोठी जमीन दान केली आहे. उद्योजक असले तरी शिक्षणाबद्दलची त्यांची दृष्टी खरोखरच उल्लेखनीय होती आणि त्यांच्या या महान दृष्टीसाठी ते नेहमीच लक्षात स्मरणार्थ राहतील.