४ गोरे मृत, पाच लाखाच्या मुद्देमा ला सह दोन आरोपीना अटक.
कन्हान ता.प्र.दी.३०: – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्ग त मध्य प्रदेशातुन कत्तली करिता कामठी ला योध्दा पिकअप वाहनात अवैधरित्या १७ जनावरे कोबुन भरून नेताना कन्हान पोलीसानी पकडुन पाच लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करित दोन आरो पीस अटक केली.
कन्हान पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहिती वरून मंगलवार (दि.२९) ला रा त्री १० वाजता दरम्यान बोरडा रोड टोल नाका जवळ मध्य प्रदेशातुन कत्तलीकरि ता कामठी ला योध्दा पिकअप वाहन क्र. एम एच ४० – बी एल – ११३८ मध्ये अवै धरित्या १७ (सतरा) गाय, गोरे असे १७ जनावरे कोबुन भरून निर्दयीपणे पाय व शिंगे दोरीने बांधुन चा-याची सोय न कर ता नेताना कन्हान पोलीसानी पकडले. यात १७ गाय, गोरे किमत एक लाख पंच विस हजार रूपयाचे यातील चार गाई मृत पावल्या, योध्दा पिकअप वाहन कि मत चार लाख असा एकुण पाच लाख पंचविस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) मोहम्मद अल्ताफ अब्दुल मोहम्मद ईकबाल वय ३२ वर्ष रा. सैलाब नगर कामठी, आरोपी २) मो हसिन शेख. मतिन शेख वय २० वर्ष रा. भाजीमंडी कामठी याना अटक केली. उशीरा रात्री गोरक्षण देवलापार ला १३ ही जनावर पोहचवुन त्याना जिवनदान दिले. व मृत चार जनावराचे गोरक्षणचे वैद्यकिय अधिकारी यानी श्वविच्छेदन ची केले. कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरिक्षक चन्द्रकांत मदने यांनी गुन्हा नोंद करून आरोपी विरूध्द कलम ११ (१), (एच), ५ (ए),५ (ब) व मोटर वाहन कायदा १८४ भादवी ४२९ नुसार गुन्हा दाखल करित दोनही आरोपीना अटक केली. पुढील तपास हे कॉ कृणाल पारधी करित आहे. ही कारवाई पी एस आय शेख, पी एस आय सुरजुसे, कॉ. मंगेश सोनटक्के, राजेन्द्र गौतम, जिंतु गावंडे आदीने करून १३ गाय, गोरे मुक्या जनावरांना जिवनदान दिले.