खोट्या तक्रारीचा भांडा फोड. पोलिसांनी तक्रारदार महिलेस केली अटक.

जानेवारी महिन्यामध्ये घाटकोपर पोलिस स्टेशन हद्दी मध्ये ‘ डिटेक्शन विभागात काम करणारे दोन पोलिस कर्मचारी त्यांचा खब री असलेला रिक्षा चालक ,एक महिला आणि तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी सलमा शेख ( बदल केलेले नाव) हिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता तिला काठीने मारहाण केली.त्यामुळे तिचा नंतर गर्भपात झाला. फिर्यादी ची लहान मुलगी तिला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता रिक्षा चालक आरोपीने तिचा विनयभंग केल्याचा लेखी तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जा वरून ऑगस्ट २०२० मध्ये बलात्कार, गर्भ पात तसेच पॉक्सो कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिस यांच्या विरोधात गंभीर आरोप झाल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेतले होते.

गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती होण्यासाठी DCP झोन 7 यांनी विशेष पथक गठित करण्यात आले होते. कांजूरमार्ग पोलिस स्टेशन मधील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तापस वर्ग करून पथकामध्ये महिला अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला होता.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.टी ने सखोल तापस केला. त्यामध्ये पोलिसांनी तक्रारदार , आरोपी व्यक्तीचे संपर्क साधने यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. घटनेच्या अनुषंगाने साक्षीदार ह्यांच्या कडे चौकशी केली. तपासाच्या दरम्यान अनेक खळबळजनक बाबी उघडकीस आल्या.

फिर्यादी घाटकोपर पोलीस स्टेशन पासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहात असताना कथित घटना घडल्यानंतर ती तक्रार देण्यासाठी गेली नाही फिर्यादी ही स्वतः अनैतिक व्यवसायामध्ये कार्यरत असल्याचे आढळून आले तिने स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी एका पोलीस अधिकात्याचे सूचनेप्रमाणे कट कारस्थान रचून एनजीओच्या माध्यमातून घटनेनंतर तब्बल 58 दिवसांनी खोटी तक्रार केल्याचे आढळून आले आहे.

या तक्रारींमध्ये प्रामुख्याने दोन घटनांचा उल्लेख केला होता त्यामध्ये एक दिनांक 12/01/2020 रोजी विनयभंगाची घटना होती. आणि दुसरी घटना दिनांक 15/01/2020 रोजी घरात घुसून चार व्यक्तींनी गर्भपात व लहान मुली भंग केल्याची होती.

पहिल्या घटनेमध्ये आरोपी म्हणून उल्लेख केलेले कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यातील एक पोलीस शिपाई तपासकामी विमानाने कानपूर येथे गेला होता . आणि रेल्वे परतीच्या प्रवासामध्ये गुजरात येथे होता. दुसऱ्या घटनेमध्ये दोन आरोपी पोलीस ठाणे येथे होते . तर रिक्षा चालक हा साकीनाका येथे घरी झोपला होता. तर महिला आरोपी त्यावेळेस राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता हजर होती.

तपास पथकाचे पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कायद्यातील तरतुदींचा आधार घेत गुन्ह्याच्या घटनेतील कट कारस्थान रेकॉर्डवर आणली त्यानंतर फिर्यादीने खोटी तक्रार दिल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा दाखल करून समक्ष न्यायालयाची तिच्याविरोधात तपास करिता मंजुरी प्राप्त करण्यात आली.

शेवटी फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारी मध्ये 120 ( ब) कटकारस्थान करणे कलम वाढवून तिला आरोपी करून अटक करण्यात आली आहे व संबंधीत पोलीस अधिकारी अद्यापी फरार आहे.

*पोलीस अंमलदार यांचे विरोधात खोटी तक्रार करून पोलिस खात्याची बदनामी करण्याचा फिर्यादी व इतरांनी रचलेला कट उधळून लावण्यात आला असून गॅंग रेप ची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेस दिनांक 25 9 2020 रोजी अटक केली आहे माननीय सत्र न्यायालयाने तिला आरोपीस चार दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *