अखेर अज्ञात सहा व फॉयनान्स कंप नी प्रबंधकावर ठाण्यात गुन्हा दाखल

कन्हान ता.प्र.दी.२५: – फायनान्स कंपनीच्या एजंट ने जबरीने एक्टिवा गाडी नेल्याप्रकरणी अज्ञात सहा व एका फायनान्स कंपनीचा शाखा प्रबंधक यांच्यावर कन्हान पोलिसां नी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर गुन्हा दाखल केला आहे.
जवाहर नगर कन्हान येथील रोहित मानवटकर यांनी एका फायनान्स कंपनी कडुन कर्जावर एक्टिवा दुचाकी क्र. एम एच ४०- बी पी ९६०७ दोन वर्षांपुर्वी घेत ली होती. नियमित कर्जाची परतफेड हो त असताना मार्च मध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेमुळे कर्जा ची परतफेड करणे जमले नाही. या संबं धात कंपनीने कोणताही पत्रव्यवहार न करता गेल्या पाच सप्टेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास कर्जदार घरी नसता ना डुप्लिकेट चाबीने हँडल लॉक उघडुन एक्टिवा दुचाकी घेऊन गेले. या कृत्यां मध्ये सहा व्यक्ती सहभागी होते. या संबं धात कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार घे ण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर हीच तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मानवटक र यांनी दिली. पण त्यांनीही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. परिणामी मानवटकर यांनी कामठीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्याया लयाने संबंधितावर गुन्हा दाखल करण्या चा आदेश दिल्यानंतर अखेर कन्हान पो लीसांनी अज्ञात सहा व्यक्ती व शाखा प्रबं धक यांच्यावर सी.आर.पी.सी १५६/३/ भा.दं संहिता १८६० चे कलम ३८९, ३९१ व ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्या त आला आहे. याप्रकरणाची पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आत्राम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *