मौदा ता प्रतिनिधी। सध्या शाळा कॉलेज बंद असून कोरोनाच्या भीतीमुळे मुले ग्राउंड वर पण एकत्र होताना दिसत नाही त्यामुळे च आज मौदा शहरात आणि विविध खेड्यात पतंग उडविण्या चा प्रकार खूप वाढला आहे आज बाजारात चायनीज मांजा मोठ्या प्रमाणत विकल्या जातो अनेकदा एखादी पतंग कटली की ती पकडण्याकरिता मुलांची धोकादायक धावपळ सुरू होते केवळ पतंग कडे लक्ष केंद्रित करून खाच खळगे यांची पर्वा न करतात मुले पतंग पकडण्यासाठी धावतात अशा वेळी अनेकदा मुले जखमी होतात या नादात अनेकांना जीव गमवावा लागतो अनेकदा पतंग चा माजा हा रहदारीच्या मार्गावर आडवा पडतो त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहे नुकताच राष्ट्रीय महामार्गावर एक पतंग तुटली त्याच वेळी मौदा येथील पत्रकार संजय गिरडे संतोष सेलोटे कृषी सहायक सतीश सरोदे विकी जाणे हे फिरायला जात असताना त्यांच्या लक्षात पतंग तुटल्याचे लक्षात आले आणि पतंग चा माझा महामार्गावर आडवा पडला होता त्यामुळे सर्वांनी त्या मार्गावरून जाणाऱ्या बाईक स्वार आना थांबवून ठेवले आणि मार्गावर पडलेला माझा काढला आणि त्यानंतर सर्व बाईक स्वार आपापल्या पुढील प्रवासाला निघाले अशाप्रकारे शेवटी ती पतंग पकडण्यात आली आणि माजा जमा करण्यात आला