कन्हान ता.प्र.दी.२४: – कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल घाईघाईने मंजुर केल्याच्या निषेधार्थ कन्हान ला सायंकाळी युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढुन केंद्र सरकारने दोन्ही विधेयक मागे घेण्या ची मागणी करण्यात आली.
डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे गुरू वार (दि.२४) ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां च्या पुतळ्याला माल्यार्पण करून युवक काँग्रेसचे नेते मा. कुणाल राऊत, नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राहुल सीरिया,
रामटेक विधानसभा अध्यक्ष निखिल पा टील, रामटेक विधानसभा महासचिव आकीब सिद्दीकी, जिल्हा उपाध्यक्ष मोह सीन खान, युवक काँग्रेस कन्हान अध्यक्ष राजा यादव आदीच्या नेतुत्वात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अने क युवा मशाल घेऊन सहभागी झाले हो ते. कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल सरकारने परत घ्यावे, बेरोजगारांना रोजगार द्यावा, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघुन मो र्चाचे समापन तारसा रोड लाल बहादूर शास्त्री चौकात करण्यात आले. मोर्चात सतीश भसारकर, सारंग काळे, प्रदीप बावणे, नगरसेवक रेखा टोहने, कुशल पोटभरे अजय कापसीकर, महेश धोंगळे सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.