कन्हान ता.प्र.दी.२४: – शहरात बकेचे एटीम लाव ण्यात आले परंतु बहुतेक मध्ये नेहमी “नो कॅश” चे फलक असल्याने नागरिकांना संपुर्ण फेरफटा मारल्यावरच एक दोन बकेच्या एटीएम मध्येच पैसे मिळतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप होऊन शह रातील एटीएम पांढरा हत्ती ठरत आहे.
कन्हान ते कांद्री शहरातील राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर व लगत पाच नॅश नल बॅका असुन नॅशनल व खाजगी बॅके चे १० एटीएम तर तारसा रोडवर दोन एटीएम लावण्यात आले. यात शनिवार, रवीवार व सुटीच्या दिवसी तर बहुतेक पैसे नसतात परंतु कामकाज चालु दिव सात व रात्री सुध्दा महत्वाच्या कामाकरि ता पैसे काढण्याकरिता शहराचा फेरफ टका मारावा लागत मानसिक त्रास सहन करावा लागतो. या बाराही एटीएम पैकी फक्त पंजाब बॅकेच्या एटीएम मध्ये नेहमी चौकीदार, सोशल डिस्टसिंग, सॅनिटाईझ र, स्वच्छता असुन पैसे असतात तर स्टेट बॅक व एक्सीस बॅक, सेंटर बॅकेचे एटीएम मधुन काही वेळ व काही दिवस सोडले तर फक्त पैसे काढता येते.आणि युनियन बॅके सहीत बहुतेक बॅकेचे एटीम मध्ये पै से नसल्याने किंवा तांत्रिक कारणाने पैसे उपलब्धच नसतात. बॅके व्दारे खाते धार कांना कोणत्याही वेळी, कमी वेळात तत्पर सेवा देण्याच्या व बॅकेचा कार्यभार कमी करण्याच्या सार्थ उद्देशाने एटीएम मशीन लावण्यात आल्या परंतु बॅकेच्या दुर्लक्षतेने एटीएम मशीनची देखरेख कर णारा चौकीदार नसणे, सोशल डिस्टसिंग, स्वच्छता, सॅनिटाईझेशन नसणे. पैसे नस णे यामुळे तत्पर सेवा तर सोडा अनाडी, वयोवृद खाते धारकांचे एटीएम मशीन मधुन अनोळखी व्यकती हातचालाकीने पैसे काढुन घेत खातेधारकांना आर्थिक नुकसान करित आहे. या सर्व कारणाने कन्हान-कांद्री शहरातील बहुतेक एटीएम मशीन पांढरा हत्ती ठरत आहे. कोरोना महामारी संकटकाळ असताना जर एटी एम सेवा व्यवस्थित बॅका न पुरवित अस ल्याने संबधित विभागाने चौकसी करून दोषी बॅकेवर कारवाई करावी. आणि सर्व सोयीयुक्त एटीएम सेवा नियमित देण्यास बॅकेला बाध्य करून खातेधारक नागरि कांना न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे.