राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कासाठी डॉ.प्रा.श्रीकांत पारखी यांची निवड

खापरखेडा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
खापरखेडा.प्र.दी.२१ मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यातर्फे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा इत्यादी क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार दिल्या जातो.सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका व्यक्तीची निवड करण्यात येते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न-२०२० पुरस्काराच्या अंतिम मानकरी यादीत नागपूर जिल्ह्यातून प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा येथे कार्यरत प्राध्यापक डॉ श्रीकांत मधुकर पारखी यांची निवड झाली असून खापरखेडा परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यानिमित्ताने पहिले एकदिवसीय ऑनलाईन गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा झूम ऑनलाईन मिटिंग अँपवर ४ ऑक्टोबर २०२० रोजी संपन्न होणार आहे प्रत्यक्ष पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे ११ डिसेंबर, पुणे येथे १६ डिसेंबर आणि नाशिक येथे २१ डिसेंबर २०२० रोजी वेळा पत्रकानुसार संपन्न होणार आहे प्राध्यापक डॉ श्रीकांत पारखी यांची राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० करिता निवड झाल्यामूळे मराविम कर्मचारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयसिंग जालंदर, सचिव ईश्वर राऊत, मुख्याध्यापक राम बांते यांच्यासह प्राध्यापक राजेंद्र धोटे, सचिन कोरडे, प्रविण साबळे, चंद्रकात गायकवाड, संगिता राऊत, आशिष चिटमूलवार, राजेंद्र गुळरांधे, कैलाश तभाने, सुनील जालंदर, किशोर बक्सरिया, यामिनी घोडमारे, अभय मिश्रा आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *