कामठी मौदा विधान सभा क्षेत्रातील नागरिकांसाठी सतत झटणारे माजी मंत्री बावनकुळे

मौदा ता प्रतिनिधी। मागील दहा वर्षे मौदा कामठी विधान सभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे आजही या या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या तेवढ्याच पोटतिडकीने शासन दरबारी मांडून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात मागील दिवसात महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती असो की कोरोना काळात निर्माण झालेली परिस्थिती त सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या असो अशा कठीण परिस्थिती सामान्य नागरिकांच्या पाठीमागे आजही ते खमबीरपणे उभे असतात कोरोना काळात हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन किंवा बेड ची समस्या असो की डॉक्टर सोबत संवाद। करण्याची वेळ असो प्रत्येक क्षणी ते सामान्य नागरिकांच्या संपर्कात आहेत आपल्या क्षेत्रातील सामान्य नागरिकाने फोन जरी केला तरी त्याची समस्या सोडविणे त्याचे समाधान करणे संकट समयी त्याला धीर देने त्याची मदत करणे हे कार्य त्यांचे कडून आजही सातत्याने होत आहे त्यामूळे आजही या क्षेत्रातील सामान्य नागरिक त्यांच्यावर तेवढेच प्रेम करत आहे आपणासाठी सतत अहोरात्र झटणारा नेता असा या क्षेत्रातील नागरिकांचा दृढ विश्वास आहे

One thought on “कामठी मौदा विधान सभा क्षेत्रातील नागरिकांसाठी सतत झटणारे माजी मंत्री बावनकुळे

  1. फक्त साहेब गरीबांचा हीताच नेता अामचे साहेब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *