अस्ति विसर्जनासाठी आलेले तीन तरुण गेले वाहून

मित्राला वाचवित असतांना किले-कोलार परिसरात घडली घटना*
एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
दोन प्रेत आढळले तर एकाचा शोध सुरू

खापरखेडा ता.प्र. दी.१९ बाबूरखेडा नागपूर येथील एका म्हातारीच्या अस्तिविसर्जना करीता आलेले तरुण आंघोळीला गेले असतांना मित्राला वाचवित असतांना दोन तरुण वाहून गेल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत अंतर्गत किले-कोलार नांदा कोराडी परिसरात घडली सायंकाळच्या सुमारास शोध मोहीम सुरू असताना दोन तरुणांचे प्रेत आढळून आले तर एका तरुणाचा शोध एनडीआरएफ ची तुकडी घेत आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
प्राप्त माहिती नुसार सर्व मृतक २५ वर्ष वयोगटातील असून मृतक तरुणांचे नाव शंतनू उर्फ नयन कैलास येडकर वय २० रा नविन बाबूरखेडा नागपूर, हर्षित राजू येदवान वय २० रा लकडापूल नागपूर, आकाश राजेंद्र राऊत वय २५ रा रामेश्वरी अजनी नागपूर अशी आहेत फिर्यादी सुमित बंडू सरवदे २५ रा नवीन बाबूरखेडा नागपूर यांच्या आजी लहानूबाई सदाशिव सरवदे वय ८२ रा यांचे निधन दोन दिवसापूर्वी झाले होते त्यामूळे दिनांक १९ सप्टेंबर शनिवारला लहानुबाईच्या अस्ति विसर्जनाचा कार्यक्रम किले कोलार (नांदा कोराडी) येथे आयोजित करण्यात आला होता अस्तिविसर्जन कार्यक्रमाला लहानुबाईचा नातू फिर्यादी सुमित बंडू सरवदे व त्याचे मित्र शंतनू उर्फ नयन कैलाश येडकर, हर्षित राजू येदवान, आकाश राजेंद्र राऊत यांच्यासह ८ ते १० नातेवाईक अस्तिविसर्जन कार्यक्रमा करिता किले-कोलार नांदा कोराडी येथे आले होते दुपारी २ च्या सुमारास लहानुबाईच्या अस्तिविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कोलार नदीच्या पात्रावर शंतनू हर्षित व आकाश हे तिन्ही मित्र आंघोळी साठी गेले होते शंतनू आंघोळीसाठी पाण्यात उतरला असतांना त्याठिकाणी डोह असल्यामुळे त्याला अंदाज आला नाही पाण्यात डुबकी घेताच शंतनू वाहू लागला शंतनू पाण्यात गटांगळ्या घेत असताना त्याला वाचविण्यासाठी आकाशने उडी घेतली मात्र तो सुद्धा वाहून जाऊ लागला त्यामुळे शंतनू व आकाश ला वाचवण्यासाठी हर्षिने पाण्यात उडी घेतली मात्र तिघेही वाहून गेले हा सर्व प्रकार फिर्यादी सुमित व त्याच्या नातेवाईकाना कळली सदर घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले एनडीआरएफच्या तुकडीने बराच शोध घेतल्यानंतर आकाश व शंतनूचे प्रेत आढळून आले तर हर्षितच्या प्रेतचा तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *